वडगाव-मावळ : अखिल भारतीय सेना मावळ तालुका, जागतिक मानवधिकार समिती पुणे जिल्हा व पायोनियर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. दिवसभर चाललेल्या या शिबिरात विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. वैद्यकीय अधिकार्यांनी विविध आजारांविषयी नागरिकांना माहिती देऊन प्रबोधन केले. जागतिक मानवाधिकार समिती, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप नाईक आणि अखिल भारतीय सेना मावळ तालुक्याचे संतोष जाचक यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय युवा सेना मावळ तालुका अध्यक्ष चरण ठाकर यांची प्रमुख उपस्थिती होती.