सरचिटणीसपदी रवींद्र म्हाळसकर
तळेगाव दाभाडे : वडगाव शहर भाजपाचे अध्यक्षपदी किरण शंकरराव भिलारे व सरचिटणीसपदी रवींद्र बाळासाहेब म्हाळसकर यांची निवड करण्यात आली. वडगाव येथील पक्ष कार्यालयात मासिक बैठकीत पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष आमदार संजय उर्फ़ बाळा भेगडे यांनी ही निवड जाहीर केली. यावेळी ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, महिला अध्यक्षा नंदा सातकर, युवक अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, शांताराम काजळे, नारायण ढोरे, अनंता कुड़े, रवींद्र घारे, सुमित्रा जाधव, अजित आगळे, उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर, गतनेते दिनेश ढोरे, नगरसेवक दिलीप म्हाळसकर, किरण म्हाळसकर, सुनीता भिलारे, दीपाली मोरे, विजय जाधव आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा
पक्ष संघटना मजबुतीसाठी प्रयत्न
किरण भिलारे हे यापूर्वी वडगाव शहर भाजपाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. तर ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थानचे विश्वस्त म्हणून काम पाहात आहेत. भिलारे हे पक्षाचे अत्यंत निष्ठावंत व विश्वासू कार्यकर्ते असून उत्तम प्रशासक आणि संघटक आहेत. यावेळी किरण भिलारे म्हणाले की, भविष्यकाळात पक्ष संघटना मजबूत करून पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील समाजासाठी पोहोचविण्याचे काम करू. ‘सबका साथ सबका विकास’ या प्रमाणे काम करण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.