वडजीत झालेल्या वादळात 7 घरांचे पत्रे उडाली

0

भडगाव । शहरासह ग्रामिण भागात 5 रोजी रात्री वादळासह पावसाच्या जोरदार पावसाने वादळात अनेक घरांचे पत्रे उडून गेली तर केळीचे पीक आडवी पडल्याची स्थिती आहे. तर रस्त्यावर झाडे पडुन वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. 5 रोजीच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास भडगाव शहरासह तालुक्यात वादळासह पाऊस बरसला. वादळामुळे तालुक्यात नुकसान झाले असल्याचे चित्र आहे. वडजी (ता.भडगाव ) येथे वादळामुळे 5 शेतकर्‍यांची उभी असलेली केळीचे पीक आडवी पडले.

कोठाली येथे सहा शेतकर्‍यांच्या केळी पिकांचे झाले नुकसान
कोठली येथेही 6 शेतकर्‍यांची केळी पिकांचे नुकसान झाले. वडजीला वादळात 7 घरांचे पत्रे उडाली. टी.आर.पाटील विद्यालयाजवळील दिनकर पाटील व शंकर पाटील यांनी दोन्ही भावडांच्या घराचे पत्रे उडाल्याने उडाल्याने दोन्हीचे संसार उघड्यावर आले आहेत. घराची परीस्थिती पाहुन कृषीभुषण त्यांच्या वृद्ध आईच्या डोळ्यात अश्रुंनी घर केले होते. काल कोळगाव मंडळात 46 मी.मी., कजगाव 30 मी.मी., आमडदे 22 मी.मी., भडगाव मंडळात 36 मी.मी.तालुक्यात एकुण 33.5 पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.