A youth from Vadji committed suicide by hanging himself बोदवड : तालुक्यातील वडजी येथील सिद्धार्थ प्रकाश सपकाळे (25) या तरुणाने भागवत इंगळे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला दोराने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीस आला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
सकाळी 10 वाजेनंतर सिद्धार्थ सपकाळे या तरुणाने शेतात आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. या तरुणाने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ व विवाहित बहिणी असा परीवार आहे. या प्रकरणी मयताचा भाऊ विनोद प्रकाश सपकाळे याच्या खबरीवरून बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार वसंत निकम करीत आहेत.