पिंपरी : महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने वडमुखवाडी येथील चालू असलेल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविला. बुधवारी केलेल्या कारवाईत सहा अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. ‘इ’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्रमांक तीन मौजे वडमुखवाडी येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे चालू होती. या बांधकामावर पालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने धडक कारवाई केली. यामध्ये वडमुखवाडी मधील स.नं. 105, कानिफनाथ चौक जवळ वडमुखवाडी रस्त्यालगतची एकूण सहा चालू अनधिकृत बांधकामे (आरसीसी बांधकाम तीन, लोड बेअरिंग विट बांधकाम तीन) असे एकुण क्षेत्रफळ अंदाजे 9173.72 चौरस फुट पाडण्यात आली आहेत. एक जेसीबी, एक डंपरच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.