वडली-वावडदा दरम्यान एकाचा अपघाती मृत्यू

0

जळगाव । पाचोरा येथे शालकाच्या लग्नाचा गोंधळाच्या कार्यक्रमाला जाणार्‍या मेव्हूण्याचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाल्याची दूर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी 7.15 वाजेच्या सुमारास वडली-वावडदा दरम्यान घडली. या अपघातात मयताचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालया उपचार सुरू आहे. विजय आत्माराम निकुंभ असे मयत तरूणाचे नाव आहे. विजय निकुंभ हे हरिविठ्ठल नगर येथील रहिवासी असून त्यांचा भिमचंद जैन नगरात लाँन्ड्रीचा व्यावसाय होता.

गोंधळाच्या कार्यक्रमाला जात होते निकुंभ
दरम्यान, मंगळवारी शालक दिपक प्रभाकर वाघ याचा लग्नाचा गोंधळाचा कार्यक्रम पाचोरा येथे असल्याने निकुंभ यांचे कुटूंबिय त्या ठिकाणी गेले होते. सायंकाळी विजय निकुंभ हे देखील मित्र विशाल विकास पवार यांच्यासोबत मोटारसायकलीने पाचोरा येथे जाण्यासाठी निघाले. सायंकाळी 7.15 वाजेच्या सुमारास वडली-वावडदा दरम्यान, त्यांच्या मोटारसायकलीचा अपघात झाला. विजय निकुंभ यांच्या डोक्याला जोरदार मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला पण मित्र विशाल पवार हा गंभीर जखमी झाला. त्यांना परिसरातील नागरिकांनी रूग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आले.

जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी
दोघांची ओळख पटत नसल्याने जखमी विशालची झाडाझडती घेतली असता त्याच्या पँन्टच्या खिशातून पाकिट मिळून आले. यात जखमी हा विशाल पवार असल्याचे ओळख पटली. यानंतर मयताच्या नातेवाईकांना मोबाईलवरून संपर्क साधल्यानंतर त्यांचे नाव देखील समोर आले. काही वेळातच मयत व जखमीच्या नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात गाठले. मयत विजय निकुंभ यांच्यापश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, जखमी विशाल पवार हा कुसंबा येथील तुळशीनगर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. तर विशाल यांच्या हातावर मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे.