चाळीसगाव ।तालुक्यातील वडाळा वडाळी येथील 24 वर्षीय विवाहिता कविताबाई नवल सुर्यवंशी ही गुरुवारी 9 रोजी घरी स्टोव्हवर चहा बनवत असतांना स्टोव्हचा भडका उडाल्याने भाजली होती. हि महिला जवळपास 70 टक्के भाजली होती. उपचारासाठी तिला धुळे येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना गुरुवारी दुपारी 1 वाजता मृत्यू झाला आहे.
धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आनंदा सूर्यवंशी यांनी खबर दिल्यावरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश मानकर करीत आहेत.