चाळीसगाव । तालुक्यातील वडाळा वडाळी येथे 9 जुलै 2017 रोजी सकाळी 11-30 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक शेजारी असलेल्या हॉल मध्ये भगवान गौतम बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना नंदुरबार येथील भंते गुणरत्न, मालेगाव चे भंते अत्तदिप यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन वडाळा वडाळी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन चाळीसगाव तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते होणार असुन प्रमुख अतिथी म्हणुन नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्षा आशाताई चव्हाण, जि.प.सभापती पोपट भोळे, पं.स. सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, के बी साळुंखे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, बाळासाहेब मोरे, रामचंद्र जाधव, घृष्णेश्वर पाटील, रवींद्र चौधरी, सयली जाधव, भगवान राजपूत, चंद्रकांत तायडे, आनंद खरात, नितीन पाटील, भाऊसाहेब पोळ, माजी जि.प. सदस्य प्रभाकर जाधव, शेषराव पाटील, पं.स. सदस्य सुनिल पाटील, माजी नगरसेवक पंडीत चौधरी, संजय घोडे, सुशील वानखेडे, आरपीआय गवई गटाचे राजु सूर्यवंशी, माजी सरपंच किसनराव जोर्वेकर, कालीदास अहिरे, डॉ.बी.पी.बाविस्कर, डॉ.प्रमोद सोनवणे, अशोक पगारे, विश्वजीत पाटील, रोहन सूर्यवंशी, यशवंत सोनवणे उपस्थित राहणार आहेत. उपस्थितीचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक सरपंच सुभद्राबाई सूर्यवंशी, उपसरपंच रत्नाबाई मोरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे.