आखतवाडे । येथील सीआयएसएफमध्ये असलेला जवान विजयसींग राजपूत हा आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारसाठी सुटीवर आलेला होता. वडील तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने जलगाव येथे रूग्णालयात निधन झाले. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कै.प्रतापसींग राजपूत (वय-59) हे पाचोरा तहसील आवारात झेरॉक्स दुकान चालवित होते. त्यांचे 7 ऑगष्ट रोजी पंधरा दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांचा एकुलता एक मुलगा विजयसींग (वय-29) हा सीआयएसएफमध्ये नोकरीस होता. सध्या चंद्रपूर येथील कोल डेपोमध्ये ड्युटी करीत होता. आपल्या पित्याच्या अंत्यसंसकारासाठी सुटीवर आलेला होता व परत ड्यूटी जॉईन करण्यासाठी लवकरच जाणार होता. अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना जळगाव येथील खासगी रूग्णालयात दाखले केले. उपचार सुरू असतांना हृदयविकाराच्या तिव्र झटक्यांने त्यांचा मृत्यू झाला. जवानाच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दीड वर्षाची मुलगी आहे.