वडीलांना घ्यायला गेला अन् रेल्वेखाली केली आत्महत्या

0

आशाबाबा नगरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्याने संपविले जीवन

जळगाव : वडीलांना रेल्वे स्टेशनवर घ्यायला जातो, असे सांगून घराबाहेर पडलेल्या जयेश सुरेश जाधव वय 23 रा. आशाबाबा नगर या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्म्हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पिंप्राळा रेल्वे गेटजवळ घडली. त्याच्या जवळील मोबाईलमुळे त्याची ओळख पटली. घटनास्थळावर त्याची उभी दुचाकीही मिळून आली आहे. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही.

चाळीसगाव प्रांत कार्यालयातील वाहनचालकांचा मुलगा

चाळीसगाव येथील प्रांत कार्यालयात कार्यरत वाहन चालक सुरेश आनंदा जाधव हे पत्नी, व मुले या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. चाळीसगाव ते जळगाव सुरेश जाधव हे रेल्वेने अपडाऊन करतात. लहान मुलगा कल्पेश हा अहमदनगर येथे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. तर जयेश हा मू.जे. महाविद्यालयात बीएसस्सीच्या तिसर्‍या वर्षाला शिकत होता. शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास जयेश हा वडीलांना रेल्वे स्टेशनवर घ्यायला जातो म्हणून आईला सांगून घराबाहेर पडला होता.

वडीलांनाच मिळाली मुलाच्या मृत्यूची बातमी

पिंप्राळा रेल्वे गेट डाऊन लाईनवर खांबा क्रमांक 418/11 जवळ शुक्रवारी रात्री 9 ़ 21 वाजेच्या सुमारास राजधानी एक्सप्रेससमेार तरुणाने आत्महत्या केली असून त्याचा मृतदेहाबाबत रेल्वे स्टेशन मास्तर एस.एस.ठाकूर यांनी लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिंद्र नगराळे, योगेश अडकणे यांनी रुग्णवाहिका तसेच पंच सोबत घेत घटनास्थळ गाठले. पंचनामा करुन मृतदेह रुग्णालयात हलविला. घटनास्थळ प्रत्येक भाग विखुरलेल्या अवस्थेत मोबाईल पडलेला होता. त्यातील सिमकार्ड काढून नगराळे यांनी स्वतःकडील मोबाईल मध्ये टाकले. यातील पप्पा नावाच्या नंबर कॉल करून झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. सुरेश जाधव, तसेच मयत जयेशचे मामा डॉ. निलेश जाधव यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यानुसार तो जयेशच असल्याचे निष्पन्न झाले. मयत मुलाला बघून सुरेश पाटील यांनी हंबरडा फोडला. शनिवारी सकाळी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात नोंद करण्यात आली आहे.