मुक्ताईनगर : सातार्यानंतर आता जळगावमध्ये वनरक्षकाला मारहाण करण्याची घटना उघडकीस आली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर वनक्षेत्र वडोदा वनपरीक्षेत्रात ड्युटी करीत असताना एका वन रक्षकाला मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात रहिम पवार या संशयीताविरोधात ुन्हा दाखल करण्यात आला. ज्ञानोबा मोहनराव धुळगंडे असे मारहाण झालेल्या वनरक्षकाचे नाव आहे.
संशयीताला हटकल्यानंतर मारहाणीचा आरोप
संशयीत आरोपी रहिम पवार हा डुकरांना मारण्याकरीता ठेवलेले गोळे घेऊन परत येत होता. यावेळी वनरक्षक ज्ञानोबा मोहनराव धुळगंडे यांनी त्यास अडवले तसेच वन्य प्राण्यांना मारण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारामुळे वन्यप्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे सांगत धुळगंडे यांनी आरोपीची समजूत काढली मात्र रहिम पवार यास त्या गोष्टीचा राग आल्याने त्याने शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून वनरक्षक ज्ञानोबा धुळगंडे यांना धक्काबुक्की केली. इतकेच नाही तर जमिनीवरील दगड उचलून त्यांच्या हातावर मारून दुखापत केली. याबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात कलम 353, 332, 326 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्याकरीता पोलिस रवाना झाले आहेत.