वड्री गावात विकली जाणारी विषारी हातभट्टीची गावटी दारूमुळे तरुणांचे आरोग्य धोक्यात दारूबंदीसाठी सरपंचांनी दिले निवेदन

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेल्या वड्डी या गावात गेल्या अनेक दिवसांपासुन मानवी जिवनास अत्यंत धोकादायक अशी हातभट्टीची गावटी दारूची खुलेआम विक्री होत असुन,या दारूच्या आहारी जावुन अनेक आदीवासी तरुणांचे जिवनावर विपरीत पारिणाम होत असुन त्यांचे आयुष्य उद्धवस्त होत असुन,सदरची ही दारूची विक्री पोलीस प्रशासनाने तात्काळ बंद करावी अशा मागणीचे निवेदन वड्री गावाचे सरपंच अजय भालेराव व आदीवासी तरूणांच्या वतीने पोलीस निरिक्षक यांना देण्यात आले आहे . या संदर्भात पोलीस निरिक्षक यावल यांना दिलेल्या निवेदनात आदिवासी तरुणानी म्हटले आहे की वड्री गावात खुलेआम सार्वजनिक ठीकाणी अत्यंत विषारी पदार्थानी बनविण्यात येत असलेली हातभट्टीची गावटी दारू विकली जात असुन , या दारूमुळे तरूणांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असुन , दारूच्या आहारी गेलेल्या तरूणांकडून गावात भानगडी व वाद उत्पन्न होत असल्याने यामुळे गावाची कायद्या सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही . तरी पोलीस प्रशासनाने तात्काळ हातभट्टीतुन तय्यार केलेली विषारी गावटी दारूच्या विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करून गावातील होणारी दारूची तात्काळ थांबवावी अशी मागणी केली असून , या निवेदनावर वड्री गावाचे प्रथम नागरीक सरपंच अजय भागवत भालेराव ,बशीर परवान तडवी, असलम हसन तडवी, हमीद निजाम तडवी , फकीरा अरमान तडवी यांच्या स्वाक्षरी आहे .