वड्री गाावातील अल्पवयीन तरुणीस पळवले ; एकाविरुद्ध गुन्हा

0

यावल- तालुक्यातील वड्री येथील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी मुकुंदा विलास सपकाळे (वय 22, रा.वड्री) असे त्याचे नाव आहे. मुकुंदा संबंधीत मुलीला घेऊन दोन दिवस बेपत्ता होता. त्यामुळे पोलिसांनी मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवत आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून सरंक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. वड्री येथील अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यात त्यांच्या 17 वर्षे 7 महिने वयाच्या मुलीस गावातील मुकुंदा विलास सपकाळे याने 20 ऑक्टोबरला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. यानंतर दोघे पैठण व तेथून नासिक येथे एका हॉटेलात राहिले. या दोघांना 22 ऑक्टोबरला मध्यरात्री कुटुंबीयांनी ताब्यात घेत यावल पोलिस ठाण्यात आणले. यानंतर मंगळवारी गुन्हा दाखल झाला. भुसावळ येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला 26 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.