वड्री धरणाचे आमदार शिरीष चौधरींच्या हस्ते जलपूजन

यावल : तालुक्यातील कष्टकरी शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्टीने हरीत क्रांतीचे जनक लोकसेवक राज्याचे माजी मंत्री स्व.बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या अथक प्रयत्नाने मान्यता मिळुन सुमारे 30 वर्षांपूर्वी पुर्णत्वास आलेल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याखालील वड्री धरणाचे जलपूजन आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते सोमवारी करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा परीषद गटनेते अप्पासाहेब प्रभाकर सोनवणे, यावल पंचायत समिती सदस्य तथा गटनेते शेखर सोपान पाटील व युवा नेते धनंजय चौधरी, खरेदी-विक्री संघाचे संचालक अमोल भिरुड, वड्रीचे सरपंच अजय भालेराव, दुलसिंग बारेला, हाजी शित्रु तडवी, अरमान तडवी, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, काँग्रेसचे कदीर खान, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष विलास सर, मासुम तडवी. वढोदा सरपंच संदीप सोनवणे, प्रदेश काँग्रेस सेवा फाऊंडेशन तालुकाध्यक्ष अभय महाजन, काँग्रेसच्या फाउंडेशनचे मीडिया प्रमुख विक्की पाटील, माजी पोलीस पाटील गोविंदा सुरवाडे, रवी पाटील व इतर काँग्रेसचे पदाधिकारी धीरज कुरकुरे, पद्माकर पाटील, कोळवदचे प्रगि.तशील शेतकरी चंदन महाजन, विकास पाटील, रमेश पाटील, महेंद्र धांडे, वैभव महाजन आदींची उपस्थिती होती. दरम्यान, यशस्वीतेसाठी काँग्रेस आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष बशीर परमान तडवी, अय्युब तडवी, युनुस तडवी आदींनी परीश्रम घेतले.