मुक्ताईनगर- तालुक्यातील वढवे शिवारात असलेल्या स्टरलिंग अॅण्ड विल्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या आवारातील पाच लाख 46 हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरट्यांनी लांबवली. 27 जुलै ते 25 ऑगस्ट दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी यज्ञेश्वर रामदास नायडू नगर मेन रोड, चेन्नई) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष चौधरी करीत आहेत.