वन्यप्राणी गणनेत आढळले 1705 प्राणी
मुक्ताईनगर (रेहान खान)- तालुक्यातील वढोदा जंगलात 30 एप्रिल ते 1 मे दरम्यान झालेल्या प्राणी प्रगणनेत एक हजार 705 प्राण्यांचे दर्शन घडले. तयात दोन वाघांच्या जोडीसह चार तडसांचा समावेश आहे. अधिकार्यांसह तब्बल 30 कर्मचारी व वन्यजीव प्रेमी प्रगणनेत सहभागी झाले. प्राणी प्रगणनेसाठी 10 मचानी उभारण्यात आल्याची माहिती वढोदा वनपरीक्षेत्र अधिकारी अमोल चव्हाण यांनी दिली.
गणनेत आढळले हे प्राणी
दोन वाघ, नऊ लांडगे, 14 कोल्हे, चार तडस, पाच अस्वल, सात रान कुत्रे, 14 जंगली मांजर, 320 रान डुक्कर, आठ उद मांजर, 17 मुंगूस, 419 नीलगाय, 75 काळवीट, 17 चिंकारा, 382 चितळ, सहा सांबर -6, 104 भेकड, 126 माकड, 82 मोर, 24 ससे, सहा सर्प, चार सादळ, 60 पक्षी आदी मिळून एक हजार 705 प्राणी आढळले.