महिलांना 1 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी
जळगाव: वढोदा वनक्षेत्रातील नियतक्षेत्र चारठाणा मधिल कं.नं.568 मधिल जंगलात मधापुरी गावातील फासेपारधी महिला अवैधरित्या वृक्षतोड करणार्या 17 महिलांना अटक केल्यानंतर त्यांना दि. 1 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
वढोेदा वनक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या वृक्षांची कत्तल केली जात असल्याच्या तक्रारी वनविभागकडे प्राप्त होत होत्या. मधापुरी गावातील महिला ह्या वृक्षतोडीसाठी गेल्या असता वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चव्हाण, वनक्षेपाल गस्तीपथक राजेंद्र राणे व रेंज स्टाफने या महिलांना ताब्यात घेतले.
महिला आरोपींची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी
या महीलांची अधिक चौकशी केली असता महीलांनी दिनांक 13 डिसेंबर रोजी नियतक्षेत्र चारठाणा मधिल कं.नं.568 मध्ये अवैधरित्या वृक्षतोड केल्याचे कबुल केले. वनगुन्हा प्र.रि.क्र.03/दि.13/2019 मधिल भा.व.अ.1927 चे कलम 26(1)अ,ड व फ नुसार 17 महीला आरोपींना अटक करुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मुक्ताईनगर येथे हजर केले असता कोर्टाने एक दिवसाची वनकोठडी सुनावली. दि. 18 जानेवारी रोजी वनकोठडी संपली. या महिला आरोपींना कोर्टात हजर केले असता 14 दिवसाची म्हणजेच दि.1 फेबु्रवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असुन सदर महिला आरोपी यांना मध्यवर्ती कारागृह जळगाव येथे रवाना करण्यात आले. जळगाव उपवनसंरक्षक दीगंबर पगार यांच्या
मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.