मुक्ताईनगर- तालुक्यातील वढोदा येथे लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून चार आरोपींनी एकाला लाकडी दांडक्याने मारहाण करत गंभीर दुखापत केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. विनोद भोंडे (40, वढोदा) यांच्या फिर्यादीनुसार 25 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास येथील शिवाजी हायस्कूलच्या पटांगणात वडाच्या झाडाखाली लहान मुलांच्या भांडणाचे कारणातून आरोपी बशीर शहा, रशीद शहा, मकबूल शहा व त्यांचा एक भाऊ यांना विचारले असता त्यांनी शिविगाळ करीत मारहाण केली तसेच फिर्यादीच्या डोक्यात बशीर शहा याने लाकडी दांडका मारत गंभीर दुखापत केली. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सुधाकर शेजोळे करीत आहेत.