Father also died while saving the child : Simultaneous funeral procession of father and son in Pachora Taluka पाचोरा : मुलाला पाण्यातून वाचवताना पित्याचाही बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील वणगाव मुलाणेत घडली. ऐन दिवाळीत गावावर कोसळलेल्या संकटानंतर पिता-पूत्रांची सोबतचही अंत्ययात्रा काढण्याचा दुर्दैवी प्रसंगी ग्रामस्थांवर आल्याने अनेकांचे मन हेलावले.
मुलाला वाचवताना पित्याचाही मृत्यू
पाचोरा वडगाव मुलाणे येथील लालसिंग पंडित पवार हे आपल्या कृष्णा या मुलासोबत दिवाळीच्या दिवशी शेतात गेले असता परतीच्या प्रवासात कृष्णाचा पाय घसरून तो नदीत पडला. यामुळे लालसिंग पवार यांनी देखील नदीत उडी घेऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनाही पोहता येत नसल्याने नदीत दोघांचा बुडून मृत्यू झाला.
एकाचवेळी निघाली अंत्ययात्रा
लालसिंग पवार आणि कृष्णा पवार या दोन्ही बाप-लेकाचा एकाच वेळेस करूण अंत झाल्यामुळे वडगाव मुलाणेसह परिसरातवर शोककळा पसरली आहे. मंगळवारी सकाळी अतिशय शोकाकुल वातावरणात या दोन्हींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार किशोर पाटील यांनी मयतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.