वणी बु.॥ येथे चिमुकल्या मुलीला फास देत मातेची आत्महत्या

धुळे : धुळे तालुक्यातील वणी बु.॥ येथे नऊ महिन्यांच्या चिमुकलीला गळफास देत मातेने आत्महत्या केली. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटन9ा घडली. या घटनेत पत्नी सोनम सुधाकर माळी (23) यांच्यासह 9 महिन्यांची चिमुकली हर्षदा माळी याचा मृत्यू झाला. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेचे नेमके कारण स्पष्ट होवू शकलेले नाही.

पोलिस प्रशासनाची धाव
घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक भूषण कोते व पथक दाखल झाले तर त्यानंतर सोनम व हर्षदा यांना हिरे रुग्णालयात नेल्यानंतर दोघांना मृत घोषित केले. रविवारी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आल्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला.