वणी – सापुतारा महामार्गावर गुजरात बसचा अपघात!

भुसावळ प्रतिनिधी 

दि. 25 ऑगस्ट 23 रोजी वणी’ सापुतारा रस्त्यावर हतगड ‘ येथे गुजरात राज्याची बस क्र. GJ18 Z 7308 ही बसला डायव्हरचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला बस रस्त्याच्या बाजूला एका झाडाला जाऊन अडकली…

बस मध्ये 25 ते 30 प्रवाशी होते प्रवाशी सुखरूप असून कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही. ही बस सुरत- नाशिक असून ही गुजरात येथून नाशिक येथे जात होती मात्र बसचे थोडे फार नुकसान झाले असुन क्रेन व जेसीबी च्या मदतीने बस रस्त्यावर काढण्यात आली जिथे अपघात झाला तिथे रस्ता उतार असल्याने वाहाने सुसाट वेगाने धावतात रस्त्याच्या बाजूला आधार म्हणून लोखंडी ब्रॉय केट बसवावे असे वाहन चालकांचे मागणी आहे