वधू-वर परिचय मेळाव्याची जोरदार तयारी

0

रावेर शहरात मराठा समाजाची बैठक ; अहवालाचे सादरीकरण

रावेर । मराठा समाज वधू-वर परीचय मेळावा व सामुदायीक विवाह सोहळ्याची तयारी सुरू झाली असून त्यासाठीच्या नियोजनासाठी समितीची एक बैठक नुकतीच घेण्यात आली. शहरातील स्टेशन रोडवरील कै.शेनाबाई गोंडू पंडित मराठा मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत मागील वर्षीचा अहवाल सादर करण्यात आला.

बैठकीस या समाजबांधवांची उपस्थिती
आगामी वधू-वर परिचय मेळावा संदर्भात कार्यक्रमाचे नियोजन ठरविण्यासाठी चर्चा करण्यात आली व आगामी कार्यक्रमाची दिशा ठरविण्यात आली. यावेळी विवाह समितीचे स्वरूप व्यापक म्हणजेच रावेर, यावल, मुक्ताईनगर, भुसावल, बर्‍हाणपूर असे करण्याचे आवाहन सभेचे अध्यक्ष पी.आर पाटील यांनी केले. समाजबांधवांनी हजर रहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रा.सी.एस. पाटील यांनी केले. यावेळी मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष राहुल पंडित, उपाध्यक्ष डॉ.सुरेश पाटील, घनःशाम पाटील, योगेश महाजन, पंचायत समितीचे सदस्य योगेश पाटील, सचिन पाटील, दिलीप पाटील, राजेंद्र चौधरी, रावेर तालुका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष विलास ताठे, छत्रपती शिवाजीराजे ब्रिगेड तालुकाध्यक्ष रावेर राजेंद्र चौधरी गहुखेडा, नरेंद्र दोडके, विनोद पाटील यांसह समाज बांधव उपस्थित होते.