नवी मुंबई : भारतामध्ये कोणतीही कायदेशीर परवानगी नसलेल्या वनकॉईन ही क्रीप्तो करन्सी भविष्यात अस्तित्वात येणार असल्याने त्यात गुंतवणूक दारांना आमिष दाखउन पैसे गुंतवण्याकरिता प्रोस्ताहित करून त्यांची फसवणूक करण्यात येत आहे. असाच फसवणुकीचा प्रकार समोर आला असता त्याबाबत नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनकॉईन ही क्रीप्तो करन्सी सन 2018 मध्ये अस्तित्वात येणार असल्याचे सांगून आजमितीला त्याचे सेमिनार विविध ठिकाणी घेण्यात येत आहेत. या करन्सीचा गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे सांगण्यात येत आहे. मात्र या करन्सीला भारत देशात कोणतीही मान्यता देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सदरची कंपनी नोंदणीकृत नसून कोणीही त्यात गुंतवणूक करू नका असे आवाहन नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.