वनजमिनी कसणार्‍या आदिवासींचे कर्ज माफ करा

0

फैजपूर । महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय आम जनसेवा पार्टीतर्फे जागतिक आदिवासी दिनी विविध मागण्यांसंदर्भात विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. सीमा राठोड हिच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच वनजमिनी कसणार्‍या आदिवासींचे कर्ज माफ करण्यात यावे यासह विविध मागण्या प्रशासनाला दिलेल्या निवेदनात समावेश करण्यात आला आहे.

या पदाधिकार्‍यांची उपस्थिती
यावेळी औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मनोज लोहार, जळगाव जिल्हाध्यक्ष दीपक परदेशी, रावेर तालुकाध्यक्ष इकबाल तडवी, शेख परवेज, शेख अमीन, अमीन तडवी, परवीन सोनवणे, रफीक तडवी, अशरफ तडवी, प्रदेश सचिव सांडू तडवी, रावेर तालुकाध्यक्ष अमीत तडवी आदींची उपस्थिती होती.

अशा आहेत न्याय हक्काच्या मागण्या
प्रदेश अध्यक्ष अजित तडवी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आदिवासी यांच्या समस्या व मागण्या जागतिक आदिवासी दिनाच्या शासन दरबारी मान्य करून त्यांना हक्क न्याय मिळावा यासह आदिवासी मुलांना शिष्यवृृत्ती वेळेवर द्यावी, बोगस आदिवासींना नोकरीतून काढण्यात यावे, गायरान व वनविभागाच्या जमिनी करणार्‍या आदिवासींचे कर्ज माफ व्हावे व त्या जमिनींचा सातबारा त्यांचे नावे करावे, शबरी विकास महामंडळ प्रत्येक जिल्ह्यात असावे, प्रलंबित जात पडताळणीची प्रकरणे त्वरित पूर्ण करावी, घरकुल योजना गाव पातळीवर सक्तीने राबविण्यात यावी, मतदान कार्ड व आधार कार्डसाठी गावपातळीवर शिबिरे आयोजित करावी, तालुका पातळीवर आदिवासी आश्रम शाळा व वस्तीगृहे स्थापन करावी आदी मागण्यांचे निवेदन औरंगाबाद विभागीय आयुक्त यांना देण्यात आले आहे.