वनडे-टेस्टमध्ये भारताचा संघ अव्वल

0

इंदूर । ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिसर्‍या एकदिवसीय सामन्यातील विजयानंतर भारतीय संघाने आयसीसी वनडे क्रमवारीमध्ये अव्वल स्थान गाठले आहे. दक्षिण आफ्रिकेला मागे टाकून भारताने वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली. सध्या भारतीय संघ वनडे आणि कसोटी दोन्ही क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर आहे. भारतीय क्रिकेट संघ 125 गुणांसह कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे.

तर इंदौर वनडेत विजयासह भारताने एकदिवसीय जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सध्या भारताच्या नावावर वनडेमध्ये 120 गुण आहेत. आयसीसी वनडे क्रमवारी आणि गुण याप्रमाणे – दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या दक्षिण आफ्रिकेचे 119 तर 114 गुणांसह ऑस्ट्रेलिया तिसर्‍या स्थानावर आहे. 120 भारत, 119 दक्षिण आफ्रिका, 114 ऑस्ट्रेलिया, 113 इंग्लंड, 111 न्यूझीलँड, 95 पाकिस्तान, 94 बांगलादेश, 86 श्रीलंका, 78 वेस्ट विंडीज, 54 अफगाणिस्तान, 52 झिम्बाब्वे, 41 आयर्लंड. आहेत.