भुसावळ। येथील स्वयंसेवी संस्था ग्रीन अर्थ फाऊंडेशन व किन्ही येथील वत्सल ऊर्जा आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने किन्ही आश्रम परिसरातील माळरानावर नैसर्गिकरित्या उगविलेली व पर्यावरणाशी तादात्म पावणार्या निम, चिंच, करंज, अड्डू, शमी आदी 21 रोप्यांचे संगोपन करण्यात आले.
गुराढोरांपासून व मानवापासून याचे संरक्षण होण्यासाठी या रोपट्यांभोवती काटेरी कवच उभारण्यात आले. बाहेरुन रोपे आणून ती लावण्यापेक्षा प्रत्येकाने डोळे उघडे ठेवून निसर्गात वावरल्यास अशी शेकडो रोपे नैसर्गिकरित्या उगविलेली दिसतील. त्यांचे काटेरी बाभुळ, बोराटी यांच्या माध्यमातून संरक्षण करणे आवश्यक आहे. याप्रसंगी ग्रीन अर्थचे संजीव पाटील, प्रा. वसंत खरे, महेंद्र बिगुल, विवेक वणीकर, वत्सल ऊर्जा आश्रमाचे मानद संचालक सुरेंद्र चौधरी, मिलींद भारंबे, भरत पाटील, भागवत भिरुड यांनी परिश्रम घेतले.