वनराई फाऊंडेशनतर्फे प्रबोधनात्मक भीमगीतांचा आज कार्यक्रम

0

भुसावळ। डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुध्द यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वनराई फाऊंडेशनतर्फे गायिका पंचशिला भालेराव यांचा शनिवार 27 रोजी प्रबोधनात्मक भीमगीतांचा कार्यक्रम आयेाजित केला आहे.

कार्यक्रमास अध्यक्ष संजय ब्राह्मणे, सुभाष लोखंडे, सचिन चौधरी, संजय तायडे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, समाजसेवक शांताराम जाधव, नगरसेवक उल्हास पगारे, गौतम लोखंडे, रविंद्र खरात, रमेश मकासरे, अ‍ॅड. धनराज मगर, थुल, राजेश परदेशी, समाधान वाहुळकर, शरद सोनवणे, विजय साळवे, राहुल बनसोडे, दिनेश जोगदंड, सुरेश यशोदे, गणेश जाधव, विलास खरात, बबलू कांबळे, मुन्ना सोनवणे, सुनिल अंबोरे आदी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष दादा निकम यांनी केले आहे. कार्यक्रमाचे संयोजन आनंद बौध्द विहार, विशाखा महिला मंडळ, भिमवाडी वॉर्ड, एसएसडी पावर क्लब, भिमवाडी वॉर्ड यांनी केले आहे.