वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून केले कामकाज

0

रावेर । वन अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केल्याबद्दल 30 रोजी वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला व महाराष्ट्र वनरक्षक संघटनेतर्फे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले की, लालमाती येथील वसंत जाधव, भागाबाई जाधव हे 15 वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेच्या वनमजूर म्हणून कामावर होते. त्यावेळी त्यांना कमी करण्यात आले होते. कामावर घेण्याबाबत जळगावच्या औद्योगिक न्यायालयात ही बाब न्यायप्रविष्ट आहे.

दोघे पती-पत्नी व सोपान पाटील राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष यांनी वनविभागाच्या शासकीय निवासस्थान आवारात मासिक सभा सुरु असतांना अधिकारी, कर्मचार्‍यांना शिवीगाळ करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे, वनपाल धिरज यांच्या विरुध्द बनावट तक्रार दाखल केली. याबाबत त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर जळगाव शाखाध्यक्ष पी.पी. शेजूळ यांची स्वाक्षरी आहे. यावेळी उपाध्यक्ष डी.ए. जाधव व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.