तळोदा । मालदा येथील स्थानिक वनविभाग कर्मचार्यांनी बाहेरच्या लोकांना कामाला लावुन मालदा येथील रहवास्याना बेरोजगार ठेवल्याची तक्रार दत्तू सुभाष खर्डे यांनी पालकमंत्री जयकुमार रावल व प्रशंसनाकडे लेखी तक्रार केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मालदा गावातील रोहियो मार्फत झालेल्या कामात प्रचंड प्रमाणात घोटाळा झाला असून मजूर रजिस्टरमध्ये जो मजूर कामाला जात नाही त्यांचे अंगठे घेतलेले आहे. शासनाच्या नियमानुसार गावातील स्थानिक लोकांना कामाला लावावे, रोजगार सेवक मोहन फाड्या खर्डे याने बिलीचावडा येथील मजुरांना डोंगरी पासिंग व खुंट्या कामासाठी काँट्रॅक्ट पद्धतीने काम करण्यास सांगितले. चार महिने उलटूनही अद्याप त्यांना पैसे मिळाले नाही, रोजगार सेवक हा मजुरांची खोटे नवे सांगून पैसे काढत असतो. जे लोक कामाला जात नाही, त्यांच्या नावावर ऑनलाईन प्रिंटमध्ये 2011 ते 2017 पर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त पैसे काढण्याच्या आरोप केला आहे.
घोटाळ्याच्या चौकशीची मागणी
जॉबकार्ड नसलेल्या मजुरांचे नावे यादीत दाखवले आहेत. गावातील लोकांना 200 रु द्यावा लागणार या हिशोबाने बाहेरील मजूर 100 रु रोजाने घेवुन जात आहे. यावरून मालदा येथील रो.हि.योत मोठा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याच्या आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. मालदा येथील स्थानिक वनविभाग व रोजगार यांची सर्वोच चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तक्रारीचे निवेदन तहसीलदार तळोदा, मेवासी वनविभाग तळोदा, पालकमंत्री जयकुमार रावल, यांच्याकडे केली असून निवेदनावर 15 ग्रामस्थांच्या सह्या आहेत.