मुक्ताईनगर:- शासनाच्या वन विभागातर्फे 2018 वर्षात 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून त्याबाबत जनजागृती करण्यासाठी चित्ररथ साकारण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातून हा चित्ररथ जळगाव जिल्ह्यात प्रवेश करीत असताना मुक्ताईनगर येथे हिरवी झेंडी दाखवून माजी महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे यांनी रथाचे स्वागत केले. प्रसंगी मुक्ताईनगर वन परीक्षेत्रपाल पी.टी.वराडे, तालुका कृषी अधिकारी व्यवहारे, वनपाल डी.एम.कोळी, राजू माळी, योगेश कोलते ,वनरक्षक आर.ए.ठोसर, सी.व्ही.पाटील, शेषराव पाटील, सुनील काटे व मान्यवर उपस्थित होते.