वनविभागाच्या छाप्यात 67 गोणी डिंकाचा साठा जप्त : खानापुरातील कारवाईने खळबळ
एकाविरोधात गुन्हा : वनविभागाच्या कारवाईने उडाली खळबळ
67 sacks of gum stock seized in forest department raid: Excitement caused by action in Khanapur रावेर : तालुक्यातील खानापूर येथील कन्हैय्या नगरातील शहनवाज सय्यद जमील यांच्या भाडेतत्त्वावरील गोदामातून वनविभागाच्या पथकाने अवैधरीत्या साठवणूक केलेला दोन हजार 390 किलो सलाई डिंक जप्त केला असून त्याचे बाजारमूल्या दोन लाख 62 हजार 900 रुपये आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
यांनी केली कारवाई
धुळे प्रादेशिक विभागाचे वनसंरक्षक दि.वा.पगार, यावल उपवनसंरक्षक यावल प्रथमेश हाडपे, रावेरचे वनरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे, अहिरवाडी वनपाल राजेंद्र सरदार, रावेर वनपाल रवींद्र सोनवणे, सहस्त्रलिंग वनपाल अरविंद धोबी, पाल वनपाल दीपक रायसिंग, वनरक्षक संभाजी सूर्यवंशी, राजू बोंडल, रमेश भुतेकर, संजय राजपूत, युवराज मराठे, सुधीर पटणे, लेदा पावरा, मुकेश तडवी, आयशा पिंजारी, कल्पना पाटील, सविता वाघ, वाहन चालक सुनील पाटील, विनोद पाटील आदींच्या पथकाने केली.