चाळीसगाव । तालुक्यातील राजदेहरे सेटलमेंट शिवारातील वन विभागात असलेल्या सुरकी टेकडी मांगल दरी जवळ 18 जून 2017 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास 25 ते 30 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेहाचा सांगाडा मिळून आला असून मृतदेहाचे जागेवर शवविच्छेदन करुन केस व हाडाचे सँपल डीएनए चाचणीसाठी घेतले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी दिली असुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला वनरक्षकाच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीतील सेक्टर 288 मधील राज देहरे (महारवाडी) सेटलमेंट शिवारात सुरकी टेकडी मांगलदरी डोंगर भागात 25 ते 30 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत सांगाडा 18 जुन 2017 रोजी चाळीसगाव वनविभागाचे वनरक्षक संजय भिकन चव्हाण यांना दिसुन आला. मृतदेह कुजलेला व फक्त सांगाडा होता आणि अंगावर साडी होती आज दिनांक 19 रोजी पोलीस उपविभागीय अधिकारी अरविंद पाटील, ग्रामीण पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, पोलिस उपनिरीक्षक प्रदिप वाल्हे यांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांना सोबत घेवुन जावुन पाहणी केली व जागेवर शवविच्छेदन करून महिलेच्या डोक्याचे केस व हाड डीएनए चाचणीसाठी नमूने घेतले असल्याचे, अशी माहिती पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी दिली व ओळखीचे आवाहन केले आहे. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप वाल्हे करीत आहे.