वनविभागातर्फे करण्यात आले गॅस संचांचे मोफत वितरण

0

बोदवड । वनविभागांतर्गत बोदवड परिमंडळातील पाचदेवळी येथे संयुक्त वनव्यवस्थापन समितीतर्फे मागासवर्गीय प्रवर्गातील पाच लाभार्थ्यांना वनविभागाकडून गॅस कनेक्शन आणि सिलिंडर वितरीत कऱण्यात आले.

वनक्षेत्राच्या परिसरात राहणार्‍या नागरिकांकडून सरपणासाठी लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो. ही समस्या सोडवण्यासाठी नागरिकांना वनविभागातर्फे गॅस कनेक्शन आणि सिलिंडरचे वाटप केले जाते. त्यामुळे सरपणासाठी होणारी वृक्षतोड थांबावी असा हेतू आहे. पाचदेवळी येथील अनिल मोरे, सुनील मोरे, जितेंद्र सपकाळे, प्रविण मोरे, मिलिंद मोरे यांना गॅस कनेक्शन वितरीत करण्यात आले. समाजातील अन्य घटकांनादेखील गॅस कनेक्शनचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही वनविभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. सरपंच कोकिळा पाटील, हरचंद सुरवाडे, हिरालाल पाटील, वनपाल किशोर वराडे, वनरक्षक विकास पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.