नवापूर । नवापुर वनपरिक्षेत्रात 1जुलै ते 7 जुलै पर्यत महाराष्ट्र शासनाच्या निर्णय 4 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्पन नुसार नवापुर वनविभाग व चिंचपाडा वनविभाग तसेच सामाजिक वनीकरणतर्फे वृक्ष लागवडीचे जाहीर आवाहन करण्यात आले. या प्रसंगी वनिता विद्यालय व श्री शिवाजी हायस्कुल, सार्वजनिक मराठी हायस्कुल या शाळेतील विद्यार्थी समवेत गावात वृक्ष दिंडी काढण्यात आली. वृक्षलागवड जन जागृती करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यानी झाडे लावा झाडे जगवा च्या घोषणा दिल्या. वनिता विद्यालय पासुन निघालेली वृक्षदिंडी संपुर्ण गावात गांधी पुतळ्यापासुन आंबेडकर पुतळा येथ येवुन समारोप करण्यात आला.
दिंडीत विद्यार्थ्यांचा सहभाग
याप्रसंगी नवापुर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे चिंचपाडा वनक्षेत्रपाल राजु पवार तसेच सामाजिक वनिकरणाचे पराग पाटील यांनी वृक्षरोपणाचे महत्व पटवुन दिले. वनक्षेत्र नवापुर वन विभाग शहादा यांच्याकडुन ग्रामीण व शहरी नागरिकांना आवाहन करण्यात आली की आपल्या घरासमोर किंवा खाली जागेत प्रत्येक एका नागरिकाने एक तरी झाड लावले पाहिजे व त्याचे संवर्धन करावे तसेच मध्यवर्गीय रोप वाटिकेत वृक्ष (रोप) सर्वाना विनामुल्य मिळेल.या प्रसंगी वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, राजु पवार, वनपाल ए.एन जाधव, एस एल कासार,कृष्णा वळवी,प्रकाश मावची,एस.बी गायकवाड,सह वन कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.