वनोलीतील बारावीच्या युवकाची आत्महत्या

0

कारण गुलदस्त्यात : झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ

यावल (प्रतिनिधी)- तालुक्यातील वनोली येथील रहिवासी व बारावीतील विद्यार्थी भूषण सुनील थाटे या तरुणाने शेतात गवताचे ओझे कापून घरी येतांना एका झाडास गळफास घेत आत्महत्या केली. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर खळबळ उडाली. रात्री फैजपूर पोलीस ठाण्यचे सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार जिजाबराव पाटील, सहाय्यक फौजदार विजय पाच पोळे, हवालदार विकास कोल्हे, महेश वंजारी आदींनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा यावल कृउबा सभापती हिरालाल व्यंकट चौधरी यांनी सहकार्य केले. या घटनेबाबत फैजपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत भूषण हा बामणोद पी.एस.एम.एस.स्कुलचा विद्यार्थी होता. अतिशय हुषार व मनमिळावू स्वभावाच्या भूषणने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. वनोली ग्रामपंचायतीचे सदस्य सुनील भास्कर थाटे यांचा तो मुलगा होय.