वन अधिकार्‍यांनी 55 हजारांचे सागाचे लाकुड केले जप्त

0

नवापुर। वन अधिकार्‍यांनी मौजे सागीपाडा येथे कारवाई करत 55 हजार 325 रूपयांचे साग लाकुड चौकट जप्त केले आहे.

वनक्षेत्रपाल नवापुर आर.बी.पवार ,वनपाल विक्री आगार पी.बी.मावची, वनपाल वडकळंबी ए.एन.जाधव, वनरक्षक उकाळापाणी एस.बी.गायकवाड, वनरक्षक कुंकराण अमोल काशिदे,वनरक्षक बी.बी.गायकवाड बारी, बी.एस.साळवे,वाहनचालक ,माजी सैनीक नाना पिंपळे,सुरेश मोरे, यांच्यापथकाने मौजे.सागीपाडा गावात जाऊन गस्त केली. या गस्त दरम्यान घराचा बाजुला ताडपत्री खाली अवैध्य रित्या साग लाकुड चौकट नंग 36 घन मीटर 1.785 आढळून आले. या जप्त केलेल्या लाकूडाची किंमत 55 हजार 325 रुपये आहे. वनपाल विक्री आगार यांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नवापुर तालुक्यात वनतस्कारांवर जबर तडाखा बसला आहे. तसेच हा माल बेवारस असुन आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग पीयुषा जगताप,सहायक वनसंरक्षक नंदुरबार जी.आर.रणदिवे यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आली.