भुसावळ। यावल वनक्षेत्रात लाकडाची तस्करी होत असल्याने वनविभागाने स्वतंत्र तीन कारवायांमध्ये पाच सायकलींसह तीन दुचाकी व लाकूड मिळून सुमारे 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 22 रोजी किनगाव ते वाघझिरा रस्त्यावर सायकलींद्वारे सागासह अंजनाच्या लाकडाची वाहतूक होत असतांना कारवाई करण्यात आली. हजार रुपये किंमतीच्या दोन सायकलींसह पाच हजारांचे लाकूड जप्त झाले.
यांनी केली कारवाई
दुसर्या कारवाईत न्हावी ते फैजपूर रस्त्यावर तीन दुचाकींद्वारे लाकडाची वाहतूक होत असतांना 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील (गस्तीपथक), संदीप पंडीत, योगीराज तेली, फैजपूर वनपाल पी.आर.पाटील, वनरक्षक दत्तात्रय जाधव व डोंगरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
वनविभागाला पाहताच तस्कर पसार
23 रोजी मारुळच्या जंगल परिसरात जळावू लाकडाची तस्करी होत असतांना चार सायकली जप्त करण्यात आल्या. एकूण चार हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तीन कारवायांमध्ये तस्कर मात्र पसार झाले.