यावल : नाते झाले ओझे येथे, ना देई मुलं बापाला अग्नीडाग
मात्र, माणुसकी जेथे नांदे तेथे प्राण्याना आपूले समजून दिली जाते अंत्यविधीत आग !
या वाक्याची प्रचिती यावल वनविभागात बघायला मिळाली अपघातात जखमी होवुन मृत पावलेल्या माकडावर वनअधिकारी कर्मचार्यांनी अंत्यविधी केला.
वनविभाग कार्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार
उच्चशिक्षीत होवून विदेशात नोकरी करणार्या पाल्यांकडून आपल्या जन्मदात्यांना अग्नीडाग देण्याकरीता टाळण्याचे अनेक घटना समाजात घडत आहेत. अशात वन्यप्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुणी तरी पुढाकार घेतांनाचे फार क्वचित दिसते. तालुक्यातील पाडळसे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या माकडावर येथील वनविभागाच्या गस्ती पथकाकडून अंत्यविधी करण्यात आला. तत्पूर्वी गुरूवारी रात्री यावल वनविभाग जळगाव कार्यालयाचे सहायक वनसरंक्षक हे पाडळसेकडून मार्गस्थ होत असतांना त्यांना मृत नर जातीचे सुमारे 8 ते 9 वर्ष वयाचे माकड आढळले तेव्हा त्यांनी वनविभाग गस्ती पथकाचे वनक्षेत्रपाल एस.आर. पाटील यांना कळवले तेव्हा त्यांनी शुक्रवारी पशूधन अधिकारी एस. ए. तांबळे यांच्याकडून शवविच्छेदन करीत वनविभाग कार्यालयात मृत माकडावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रसंगी वनरंक्षक शिवाजी माळी, जगदीश ठाकरे, संदीप पंडीत, योगीराज तेली, वनपाल महेश पाटील, नंदू वंजारी, चव्हाण, जितु सपकाळे आदींची उपस्थिती होती.