मुक्ताईनगर:- प्रदेश भाजपाने राबविलेलया ‘वन बुथ थर्टी युथ’ या संकल्पनेनुसार मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ राज्यत प्रथम आला आहे. या कामासाठी जिल्हा चिटणीस तथा माजी सभापती विलास धायडे यांची विस्तारक म्हणून नियुक्ती प्रदेशाधक्ष रावसाहेब दानवे केली होती. माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षाखडसे, जिल्हा सरचिटणीस रोहिणी खडसे यांच्या मार्गदर्शनखाली धायडे यांनी कामात विशेष लक्ष घालून ऑनलाईन कामात गती घेतली. फेब्रुवारी महिन्यात कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. मतदारसंघातील 304 बुथ ऑनलाईन झाले आहेत. बुथ ऑनलाईन करण्याकामी रावेर, बोदवड, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष, जि.प.सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य व पदाधिकार्यांचे सहकार्य लाभले.