शिक्रापूर । मांडवगण फराटा(शिरूर) व बाभुळसर बु. (शिरूर) येथील लाभार्थ्यांना वन विभागाच्या वतीने देण्यात येणार्या गॅस कनेक्शनचे वाटप आणि बिबट्याच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या शेतकर्यांना चेकचे वाटप शिरूर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे आणि दादा पाटील फराटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी सभापती बबन आण्णा गदादे, हानुभाऊ पाटोळे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे, मांडवगण च्या सरपंच सुवर्णाताई फराटे, बाभुळसरच्या सरपंच शैलजा नागवडे, नवनिर्वाचित सरपंच शिवाजी आण्णा कदम, माजी संचालक कैलासराव सोनवणे, बाळासाहेब फराटेे, महेश काका बेंद्रे, फिरोज शेख साहेब, पांडुरंग फराटे, आत्माराम बापु फराटे, बाळ काका फराटे, पंडित बाप्पा फराटे, उपसरपंच अशोक नाना फराटे, ग्रा.सदस्य रवींद्र टेकवडे, नाना गायकवाड, शरद नागवडे, राजू पाटील फराटे, प्रभाकर आण्णा घाडगे, अशोक शितोळे, किशोर फराटे, सतीश नागवडे, दत्तात्रय नागवडे, अमित नागवडे, वन विभागाचे प्रभागातील सर्व अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिवशक्ती गॅसचे चेअरमन प्रताप फराटे आणि शिरूर तालुका भाजपा उपाध्यक्ष सचिन मचाले यांनी केले होते.