परभणी। राज्य शासनाने महामार्गावरील दारूची दुकाने बंद केल्यानंतर महामार्गावरील सर्वच परमिट रूम, बिअर बार, वाईन शॉपवाल्यांनी आपला मोर्चा शहरातील मध्यवस्तीकडे वळवला आहे. त्यामुळे शहरात अक्षरशः दारूचा पूर वाहत आहे.
मात्र असे असताना, शहरातील लोकमान्य नगर परिसरातील वनविभागाच्या कार्यालयासमोर असलेली दारूची सर्व दुकाने महापौर मिना वरपूडकर यांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने बंद केली आहेत. जिल्ह्यात होणार्या दारू विक्रीच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता, दर महिन्याला जिल्ह्यात लाखो लिटर दारूची विक्री होत असल्याचे समजते.
जिल्ह्यात विना परमीट, महसूल बुडवून आणि राजरोसपणे दारू विक्री होत आहे. राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकार्यांनी याकडे लक्ष देवून मध्यवस्तीत असलेल्या दारूच्या दुकानांना परवाना देवू नये, अशी मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात आली आहे.