जळगाव : पारोळ्यातील प्रौढाला बोलण्यात गुंतवणूक त्यांच्या हातातील अंगठी भामट्याने लांबवली होती. या प्रकारे होत असलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने फसवणूक करणार्या भामट्याच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. डिगंबर कौतीक मानकर (न्हावी , 52 आसोदा रोड हरीओम नगर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीला जळगाव शहरातील हरीओम नगरातून अटक करण्यात आली.
यांच्या पथकाने केली अटक
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय युनूस शेख इब्राहिम, हवालदार सुनील पंडित दामोदरे, हवालदार दीपक शांताराम पाटील, नाईक नंदलाल दशरथ पाटील, नाईक भगवान तुकाराम पाटील, नाईक प्रमोद अरुण लाडवंजारी, नाईक राहुल मधुकर बैसाणे, कॉन्स्टेबल सचिन प्रकाश महाजन आदींच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीला तपासकामी पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.