वयोवृद्ध इसमाची पैशांची बॅग हिसकावून पळ काढला

0

कल्याण : पेन्शनचे पैसे काढून पत्नीचे औषधे घेण्यास जाणाऱ्या एका 78 वर्षीय वृद्ध इसमाची पैशांची बॅग घेऊन एका चोरट्याने पळ काढल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली .या प्रकरणी वृद्ध इसमाने दिलेल्या तक्रारीनुसार कोळशेवाडी पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

कल्याण पुर्वेकडील पूना लिंक रोड वरील हरी कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे 78 वर्षीय विश्वनाथ सरफरे यांची पत्नी धनवंतरी रुग्णालयात एमडीट आहे .सरफरे यांनी आपल्या बँकेतून पेंशन ची रक्कम काढून काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ते काटेमानवली येथे आपल्या पत्नीचे औषधे घेऊन हॉस्पिटलमध्ये जात असताना अचानक पाठीमागून येणाऱ्या एक इसमाने त्यांना धक्का मारत त्यांच्या जवळील पैशांची कापडी पिशवी हिसकावत पळ काढला त्यांनी या चोरट्या चा पाठलाग ठरत आरडाओरड केली मात्र हा चोरटा आपल्या तीन साथीदारांसह तेथून जवळच असलेल्या एका रिक्षात बसून पळून गेला .या प्रकरणी सरफरे यांनी कोळशे वाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्या अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केलं आहे.दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून कोळशेवाडी परिसरात भुरट्या चोरट्यांचा वावर वाढला असून वाढत्या घटना पाहता त्यांना पोलीसांची भीतीच उरली नसल्याचे दिसून येत असल्याने पोलीस यंत्रणा ही सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे .