स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची वाहनधारकांची मागणी
वरखेडी – वरखेडी-साजगाव-मोहाडी-पहाण-नांद्राचा रस्ता 12 किमीचा असुन 2-3 ठिकाणी फरशी पुल व पाच ते सात किमीचा रस्त्याचेचे मजबुती करून डांबरीकरण करून हा रस्ता वरखेडीवरून जाणार्या कोठरे दिगर सटणा पहुर राज्य मार्ग क्र. 19 पासुन ते नांद्रा या गावा वरून जाणार्या चांदवड ते जळगाव या राज्य क्र.184 ला जुडते. परंतू दोन-तिन ठिकाणी फरशी पुल व जवळजवळ सात किमीचा रस्ता अत्यत खराब असल्याने त्याची मंजबूती करून मिळावी. या रस्त्याच काही भाग पंतप्रधान ग्रामसडकमध्ये करण्यात आला आहे. आणि तोच 5 किमीचा रस्ता पुर्ण चाळणी झाला आहे. पहुर हुन जावे लागते वरखेडी ते साजगाव नांद्रा हा रस्ता चे काम पंतप्रधान ग्रामसडक किंवा मुख्यमंत्री ग्रातसडक या मोठ्या योजनेत समाविशष्ठ करून केले तर दोन ही राज्यमार्गशी रस्ता जुडेल व या परीसरातील जनतेची सोय होईल. तर या वरखेडी साजगाव मोहाडी पहाण नांद्रा रस्त्याकडे जलसंपदामंत्री गिरीष महाजान, खासदार ए.टी.नाना पाटील, आमदार किशोर पाटील व लोकप्रतीनिधी यांनी लक्ष देऊन राज्य मार्ग क्र 19 ला प्रजिता 36 च्या माध्यमातून राज्य क्र 184 ला जोडावे आशी मागणी आहे.