वरखेडी, भोकरी, सावखेडा शाळांमध्ये लसिकरणास सुरूवात
वरखेडी – गोवर रूबेला लसिकरण मोहिमेचा शुभारंभ वरखेडी प्रा.आरोग्य केद्रांतर्गत भोकरी येथील जि.प. उर्दु शाळेत करण्यात आला. पी.डी. बडोला माध्यमिक विद्यालयात कार्यक्रमाच्या अध्यस्थानी पं.स. उपसभापती अनिता पवार होत्या. 9 महीने ते १५ वर्षेपर्यंतच्या मुले व मुलांना गोवर रूबेलाची लस देणे आवश्यक आहे. यामुळे कोणत्या प्रकारच्या आजार मुलाना होणार नाही या गोवर रूबेला च्या लसीकरणा बाबत जागृती करण्याचे आवाहान केले.
यांची होती उपस्थिती
याप्रंसगी जि.प.सदस्य मधुकर काटे, प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलेद्र चव्हाण, डॉ.रागिनी सिंगाडे, मौलाना अरमान, मुख्यध्यापक शेख सलीम शेख लाल, ग्रा.पं. सदस्य बाबुभाई अब्दुल काकर, हायसुकल मुख्याध्यापक आशोक चौधरी, पर्यवेक्षक ठोके, आरोग्य सहाय्यक विजयकुमार विंचु, आरोग्य सेवीका बी.एस.वाघ, वाय.जे.पाटील, आर.आर.पावरा, जी.डी.शिरसाठ, आशोक धुरंधरे, श्रीमती कुमावत आदीच्या उपस्थितीत गोवर रूबेला लसीकरण मोहीमेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी विद्यार्थीला प्रमाणपत्र देण्यात आले. वरखेडी प्रा.आ. केंद्र अतंर्गत चलनाच्या गोवर व रूबेला कार्यक्रम अंतर्गत २८ नोव्हेंबर २०१८ रोजी साई इंटरनॅशन स्कुल वरखेडी शांताराम सोनजी प्राथमीक विद्या मंदीर, जिल्हा परीषद प्राथमिक विद्या मंदीर, जि.प.प्राथमिक विदया मंदीर सावखेड बु, जि.प.मराठी शाळा सावखेडा खु याठिकाणी पाचोरा तालुका वैधकीय आधिकारी समाधान वाघ, प्रा.आ. केंद्र वरखेडी डॉ.शैलेंद्र चव्हाण, मुख्यध्यापीका स्वाती पाटील, विद्या प्रबोधन मुख्यध्यापक अरविंद पाटील, जि.प.मराठी शाळा मुख्याध्यापक जगन्नाथ पवार, आशा सेवीका आंगणवाडी सेविका, शाळेतील सर्व शिक्षक उपस्थीत होते.