वरखेडी भोकरी येथे श्री संताजी जगनाडे यांनी अभिवादन

0

वरखेडी : येथे श्री संताजी महाराज पुण्यतिथी साजरी वरखेडी भोकरी येथे श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सहात साजरी करण्यात आली. श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बांधवातर्फे समजाचे आराध्यदैवत थोर संत तुकाराम महाराजाचे शिष्य श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्सावात साजरी करण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील यांच्या शुभहस्ते संताजी जगनाडे महाराजाच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली.

तेली समाज मंगल कार्यलयाचे उद्घाटन तेली समाज प्रत उपाध्यक्ष महेश चौधरी, दीपकसिंग राजपूत यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात माजी आमदार आर ओ पाटील यांनी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या कार्यबद्दल उजाळा देण्यात आला. सांयकाळी वरखेडी-भोकरी या गावातून श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची सजवलेल्या गाडीतून टाळ मृदुंगाच्या गजरात व वाद्सह गावातून पालखी मिरवणूक काझ्यात आली. रात्री हभप निवृती नाथ मोरे यांचे किर्तन झाले. यावेळी कुंदन चौधरी, गजनान पाटील, सखाराम मराठे, डॉ.जितेंद्र चौधरी, भगवान चौधरी, देविदास चौधरी, राजू चौधरी, धनराज चौधरी, शंकर चौधरी, संजय चौधरी, खंडू चौधरी, संभाजी चौधरी, ग्रा.पं.सदस्या डॉ.सरला चौधरी, ज्ञानेश्‍वर चौधरी, पत्रकार रविशंकर पांडे, दिलीप जैन यांच्यासह समाजबांधवाची व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

यांची होती उपस्थिती
यावेळी कार्यक्रमात माजी सभापती कृषी बाजार समती, दिनकरराव देवरे, उद्धव मराठे, अरुण पाटील, देवेद्र गांगुर्डे, मनोजबापू चौधरी, उमेश चौधरी, पाचोरा नगराअध्यक्ष संजय गोहिल, नगरसेवक दादाभाऊ चौधरी, पं.स.सदस्य अरुण तांबे, भैय्यासाहेब देवरे, डॉ. रशीद काकर, उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्‍वर सोनार, माजी ग्रा.पं. सदस्यरशीद हजी उखर्डू , गोकुल चौधरी उपसरपंच, वरखेडी या मान्यकराची उपस्थिती होती.