वरखेडी येथे गुरांच्या खळ्याला आग

0

वरखेडी ता पाचोरा (वार्ताहार)- येथुन जवळच असलेल्या लोहारी बु. येथील गुराचे व्यापारी हाजी सईद अ करीम कुरेशी यांच्या गावाजवळील पाचोरा जामनेर रोडलगत असलेल्या गुराच्या खळ्यासह चाराच्या गोडाउनला अचानक दुपारी 1.20 च्या सुमारास अती उष्णतेमुळे आग लागली.
खळ्याला लागलेली हि आग आटोक्यात आण्यासाठी सर्व प्रथम गावातील ग्रापचे पदाधिकारी व युवकांनी ग्रामस्थानी आजुबाजुच्या वस्तीतील बोरींगच्या पाण्याने आग आटोक्यात ठेवुन विझाविण्याचा प्रत्यन केला नंतर पाचोरा व भडगाव आग्निोशामक ग्रामस्थाच्या सहकार्याने दोन ते अडीच तासा नंतर आग विझविन्यात यश्स्वी झाले या आगीत हाजी सईद यांच्या गोडाउन बोरवेल मोटर पाईप शेतीचे आवजार, 15 हजार पेंढी, दादरचा चारा जळुन खाक झाला. अंदाजे 7 ते 8 लाख रूपयाचे नुकसान झाले. खळ्यातील म्हशी व बैल व गुरांना कोणत्याही प्रकारची ईजा झाली नाही किंवा प्राणहाणी झाली नाही. परंतु आर्थिक नुकसान झाले. घटनास्थळी पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनचे हेकॉ राजु पाटील, पोलीस माळी, वरखेडीचे तलाठी ज्योती चिचोंले यांनी भेट देउन तातडीने पंचनामा केला.