धुळे । तालुक्यातील वरखेडी येथे धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते आदिवासी वस्तीत सामाजिक सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले असून आ. पाटील यांच्या प्रयत्नाने विविध विकासांची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत. धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून आदिवासी वस्तीत सामाजिक सभागृह उभारण्यात आले आहे. या सभागृहाचे उद्घाटन दि.22 रोजी गुरूवारी आ.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
भविष्यातही विकासकामे करण्याची ग्वाही
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे हे होते. यावेळी वरखेडी येथील पं. स. सदस्य ज्ञानेश्वर मराठे यांनी आपल्या प्रास्ताविकात माहिती देताना सांगितले की, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी निवडणुकीत दिलेले आश्वानाप्रमाणे वरखेडी गावात विविध विकासाची कामे पूर्ण केली आहेत. त्यात आदिवासी वसाहतीत काँक्रिटीकरण व फेव्हर ब्लॉक, गावातील पुनर्वसन भागात स्थानिक निधीतून काँक्रिटीकरण, अशी विविध कामे पूर्ण झाली आहेत. कार्यक्रमाला पं.स.उपसभापती दिनेश भदाणे, गुलाबराव पाटील, राजेंद्र भदाणे, राजू मालचे, किरण अहिरराव, मुकेश पवार, भोलेनाथ पाटील, प्रमोद भदाणे, विलास धनगर, भानुदास माळी, दिलीप माळी, भाईदास पाटील, एम.पी.पाटील, सुधाकर पाटील, गुलाबराव मराठे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कैलास मराठे, राजू भिल,भावराव भिल, अर्जून भिल, नवल धनगर, पांडुरंग चौधरी, अशोक चौधरी,राजेंद्र पटेल,रवींद्र पाटील, ज्ञानेश्वर मराठे आदी उपस्थित होते.