वरखेडी। येथील योगेश भगवान लोणारीहे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त होवून गावी आले असता ग्रामस्थांनी मित्रपरिवाराने व गावातील युवा मंडळाच्या तरुणांनी त्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून जाहीर सत्कार केला. योगेश लोणारी हे 1999 यावर्षी सैन्य दलात भरती झाले व ते शिपाई होते. सेवानिवृत्ती वेळेस ते हवलदार पदावरती होते. यांनी 18 वर्षी प्रदीर्घ काळ देशसेवा करून सेवानिवृत्ती झाले. योगेश लोणारी हे गरीब कुटुंबात तरून असून त्यांच्या घरची परस्थिती हि जेम तेम होती. मोठा भाऊ कै.अशोक लोणारी यांच्या प्ररणेने तो भारतीय सैन्यात भरती झाला होता. योगेश लोणारी यांनी आर्मीत सेवा करत असताना 18 वर्षाचा कार्यकाळात देश सेवेत उत्कृष्ट कार्य केले असून त्यांना पाच वेळा विविध शैर्य पदक देऊन त्यांना स्मान्नीत करण्यात आले आहे योगेश लोणारी सेवा निव्रती होऊन परतला म्हणून नातेवाईक मित्र परिवार गावकर्यांच्या वतीने गावातून मिरवणूक काढून जाहीर सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील ग्रामस्थांनी दिल्या शुभेच्छा
यावेळी माजी सरपंच धनराज विसपुते, संतोष पाटील, रामभाऊ चौधरी, तालुक्याचे आमदार किशोर पाटील भावी आयुष्यासाठी आशीर्वाद देऊन देशसेवा बरोबरच आता सेवानिवृत्त बरोबरच गावाची सुध्दा सेवा घडो त्यांचे भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पं.स. सदस्य ज्ञानेश्वर सोनार, साहेबराव नामदेव कानडे यांनी सत्कार केला. तर आमदार किशोर पाटील, सेना जिल्हाप्रमुख आरुण पाटील शेतकरी, माजी जि.प.सदस्य दीपकसिंग राजपूत, गणेश पाटील, भाजप युवानेते व नगरसेवक अमोल शिंदे, माजी नगरसेवक प्रदीपबापू पाटील, सपोनि संदीप पाटील पिंपळगाव हरेसंतोष पाटील, रशीद हजी उखर्डू, ईस्माईल हजी फकीरा, राकेश पाटील, सखाराम मराठे, पी.टी.पाटील, दीपक बागुल, हितेश पाटील, संजय बडोला यांच्यासह आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन रामभाऊ चौधरी यांनी केले तर आभार सेवानिवृत्त सैनिकाचे आई वडील भगवान लोणारी सीताबाई लोणारी यांनी केले.