वरखेडी । यागावी सालाबादप्रमाणे पांडुरंग कृपेने साधूसंताच्या आशीर्वादाने गुरुवर्य ह.भ.प बाबूलाल महाराज यांच्या प्रेरणेने ह.भ.प कौतिक महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामस्थांच्या सहकार्याने अखंड हरीनाम किर्तन सप्ताह व गुरुचरित्र पारायण सोहळानिमित 27 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान अखंड हरी नाम किर्तन होणार आहे. सप्ताहात मृदुगाचर्य ह.भ.प. गजानन महराज शेरी लोढरी किर्तन साथ वरखेडी पंचक्रोशीतील भजनी मडळाची लाभणार आहे. या अखंड हरी किर्तन सप्ताहचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन श्रीराम भजनी मंडळ प.पु.ताई महाराज महिला भजनी मंडळ वरखेडी-भोकरी यांनी केले आहे.
कार्यक्रमाची दैनंदिनी याप्रमाणे
सकाळी 5 ते 6 काकडा आरती दुपारी 4 ते 5 ज्ञानेश्वरी प्रवचन सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ रात्री 8:30 ते 10:30 हरी किर्तन असे कार्यक्रम होणार आहेत 30 नोव्हेंबर रोजी गिता जयंती व 3 डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव होणार आहे. 27 नोव्हेंबर रोजी ह.भ.प पांडुरंग महाराज आवारकर. जळगाव. 28 नोव्हेंबर रोजी ह.भ.प. अरुण महाराज मगर कोपरगाव,जि नगर. 29 रोजी ह.भ.प. कौतिकजीमहाराज वरखेडी ता पाचोरा. 30 रोजी ह.भ.प. अमृत महाराज गाढे बेटावदकर. 01 डिसेंबर रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज मोरे ,कॉन्सटेबल पिंपळगाव हरे. 02 रोजी ह.भ.प. संजीवनीताई ,हाळदा जि.औ.बाद. 03 रोजी ह.भ.प. मनोज महाराज कुलकर्णी, पिंप्राळा 04 रोजी ह.भ.प. मनोज महाराज कुलकर्णी, पिंप्राळा याचे काल्याचे किर्तन होईल.